तुला मात्र न उमजलेल कोडच बरं..!!

काळ - गोष्ट त्या वेड्या ताऱ्याची.. हजारो ताऱ्याची पैकी एका ताऱ्याची..
फक्त दुरूनच आवडत्या चांदणीला पाहणाऱ्या व्यथा भोळ्या मनाची..











तुला मात्र न उमजलेल कोडच बरं..!!

 मी आकाशात भरकटलेला पतंग.. तू त्याची तुटलेला मांजा..
मी  निरपराधी कैदी , तू त्याला सुनावलेली सजा..
मी मनाला सतत टोचणारी खंत , तर तू त्याचा भक्कम विश्वास..
मी गंज लागलेला लोखंड, तर तू सोन करणाऱ्या परिसाचा सहवास..!!
मी फक्त एक नदी.. मी फक्त एक नदी..
तर तू हजारो नद्यांचा अथांग असा समुद्र..
मी आभाळाकडे बघणारा कमजोर शेतकरी तर तू न पडलेला पाऊस..
मी एक विस्कटलेले स्वप्न तर तू काळ्याभोर रात्रीचा ध्यास..
तरी तुला मात्र न उमजलेल कोडच बरं..!!

मी अभेद्य गड , तर तू सुंदर ताजमहाल..
मी शौर्याची निशाणी तर तू पवित्र प्रेमाची..
मी काटेरी टोचणारे गुलाबाचं रोपटं, तर तू न फुललेली कोवळी कळी..
मी निखळ मैत्रीची निशाणी तर तू मन मोहक सुंदरतेची..!!
मी विस्कटलेले शब्द.. तू साधलेली गोड अशी कविता..
मी जमिनी वरची माती तर तू भिंतीवरच्या विटा..
मी सावळा कृष्ण तर तू साधी भोळी मीरा..
मी एकटाच स्वतःभोवती फिरणारा वेडा भोवरा..
तरी तुला मात्र न उमजलेल कोडच बरं..!!

मी जुना मोडलेला संगणक, तर तू कोऱ्या कागदावरच कलम..
मी न बरी होणारी ओली झखम तर तू झोंबणारी मलम..
मी भटका पक्षी तर तू कैद करणारा पिंजरा..
मी पावसात नाचणारा मोर तर तू डोलणारा त्याचा पिसारा..!!
मी चैत्राचा महिना.. तू निसर्गाची पालवी..
मी भटका वाटसरू, तर तू कुशीत घेणारी झाडाची सावली..
मी चातक पक्षी तर तू निखळ मन-मोहक पाऊस ग्रीष्मातला..
फक्त एका थेंबासाठी आसुसलेला..
तरी तुला मात्र न उमजलेल कोडच बरं..!!

मी तुला शोधणारी निरागस अशी नजर, तर तू कधी कधी दिसणारी झलक..
मी दारूची एक बाटली, तू स्वतःच्या जगातली अट्टल शराबी..
त्या बाटली प्रमाणे कधीच उणीव ना त्याची जाणवणारी..
मी फोटो काढण्याचा बहाणा.. तू निळाभोर ड्रेस मधली परी..
मी चहा चा शौकीन तर तू अर्धवट मांडलेली गोष्ट खोटी-खरी..!!
मी नकोस वाटणारा ग्रहण.. तू हवा हवासा चंद्र..
मी तळपणारा सूर्य तर तू शांत अशी घनघोर रात्र..
मी सागरातली भरकटलेली होडी तर तू अखेरचा किनारा..
बुडताना सुद्धा सागराला मिठी मारणाऱ्या होडीला न कशाचा सहारा..
तरी तुला मात्र न उमजलेल कोडच बरं..!!
तरी तुला मात्र न उमजलेल कोडच बरं..!!

- मुकुंद पाडळे (४ नोव्हेंबर १८, रात्री १.४६ )

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मर्द को दर्द ..

कुर्बान