काळ - गोष्ट त्या वेड्या ताऱ्याची.. हजारो ताऱ्याची पैकी एका ताऱ्याची.. फक्त दुरूनच आवडत्या चांदणीला पाहणाऱ्या व्यथा भोळ्या मनाची.. तुला मात्र न उमजलेल कोडच बरं..!! मी आकाशात भरकटलेला पतंग.. तू त्याची तुटलेला मांजा.. मी निरपराधी कैदी , तू त्याला सुनावलेली सजा.. मी मनाला सतत टोचणारी खंत , तर तू त्याचा भक्कम विश्वास.. मी गंज लागलेला लोखंड, तर तू सोन करणाऱ्या परिसाचा सहवास..!! मी फक्त एक नदी.. मी फक्त एक नदी.. तर तू हजारो नद्यांचा अथांग असा समुद्र.. मी आभाळाकडे बघणारा कमजोर शेतकरी तर तू न पडलेला पाऊस.. मी एक विस्कटलेले स्वप्न तर तू काळ्याभोर रात्रीचा ध्यास.. तरी तुला मात्र न उमजलेल कोडच बरं..!! मी अभेद्य गड , तर तू सुंदर ताजमहाल.. मी शौर्याची निशाणी तर तू पवित्र प्रेमाची.. मी काटेरी टोचणारे गुलाबाचं रोपटं, तर तू न फुललेली कोवळी कळी.. मी निखळ मैत्रीची निशाणी तर तू मन मोहक सुंदरतेची..!! मी विस्कटलेले शब्द.. तू साधलेली गोड अशी कविता.. मी जमिनी वरची माती तर तू भिंतीवरच्या विटा.. मी सावळा कृष्ण तर तू साधी भोळी मीरा.. मी एकटाच स्वतःभो...