तुझ्या वाटेला येवू नये हेच समजवायचे होत.. !!
तुझ्या वाटेला येवू नये हेच समजवायचे होत.. !! कस सांगू ग मी तुला ? माझ्या वेड्या हृदयातील भावना.. कंठ दाटून येतो, सांगताना माझ्या मनातील वेदना .. !! गुदमरतो हा जीव माझा, का तुज समजत नाही ? चांदणीला चंद्रास भेटायला, का तिला उमजत नाही ? लग्नासाठी डाव मांडला, मी हा अट्टाहासाचा.. तू हो म्हणशील लग्नाला, या खोट्या अन भाबड्या आभासाचा.. !! कोरडी हि स्वप्ने माझी, ओली का होत नाही ? अपेक्षाच्या डंखाने, मला मरण का येत नाही ? भूतकाळातल्या चुका खूप काही शिकवून गेल्या .. कोंदट, पश्चात्तापाच्या असंख्य रात्री जागवून गेल्या .. !! अपराधी पणा मध्ये जगन खूप अवघड असत.. तुझ्या वाटेला येवू नये हेच समजवायचे होत.. !! - मुकूंद पाडळे