तुझ्या वाटेला येवू नये हेच समजवायचे होत.. !!


तुझ्या वाटेला येवू नये हेच समजवायचे होत.. !!

कस  सांगू ग मी तुला ? माझ्या वेड्या हृदयातील भावना..
कंठ दाटून येतो, सांगताना माझ्या मनातील वेदना .. !!

गुदमरतो हा जीव माझा, का तुज समजत नाही ?
चांदणीला चंद्रास भेटायला, का तिला उमजत नाही ?

लग्नासाठी डाव मांडला, मी हा अट्टाहासाचा..
तू  हो म्हणशील लग्नाला, या खोट्या अन भाबड्या आभासाचा.. !!

कोरडी हि स्वप्ने माझी, ओली का होत नाही ?
अपेक्षाच्या डंखाने, मला मरण का येत नाही ?

भूतकाळातल्या चुका खूप काही शिकवून गेल्या ..
कोंदट, पश्चात्तापाच्या असंख्य रात्री जागवून गेल्या .. !!

अपराधी पणा मध्ये जगन खूप अवघड असत..
तुझ्या वाटेला येवू नये हेच समजवायचे होत.. !!

 - मुकूंद पाडळे

Comments

Popular posts from this blog

मर्द को दर्द ..

कुर्बान