रात्रीचे 1.19 वाजले असावे बहुदा !
झोप लागेना म्हणून म्हटलं जे विचार डोळ्यासमोर हिंदोडे घालत आहेत ते मांडावे .. विचार स्थिर तरी होतील !
केहते है ना? मर्द को दर्द नही होता ? साफ चुकीचं आहे.. म्हणून च आम्ही वाट बघतो घरातले सगळे झोपण्याची .. कसला हा पुरुषार्थ? जिथे त्याच्या शक्ती ला निर्बलता चा स्वरूप देतं.. ?
men should never cry ? why ? all bullshit. come on !!
Actaully , पुरुषप्रधान देशात आम्हाला लहानपणा पासून हेच बिंबवला जात कि तू मुलगा आहेस, रडायचं नाही.. and bla bla bla ..
असो, लिहायचा तात्पर्य हेच कि एका मुलाला, वडिलांचा विरह सहन होत नाहीये ..डोंगरा एवढा बाप गमावून वनवास भोगणे खूप कठीण.. आठवण वाऱ्या सारखी सपाटा मारून जाते.. बोचरी आहे ती .. अश्रू थांबत नाहीत ( काळ्या कठोर अंधाऱ्या रात्रीचा आधार घेऊन .. ) तेच ते.. "मर्द को दर्द .. " होतो रे .. फक्त विचारणारा हवाय.. तो अधिकार खूप म्हणजे खूप कमी लोकांकडे असतो बरं का..!
आयुष्यात एक प्रसंग असा येतो, स्मरण रहे.. प्रत्येकाच्या आयुष्यात..! कि जिथे प्रसिद्धी, पैसा, ऐश्वर्य, गाडी, घर, living standard etc सगळं काही व्यर्थ वाटत.. त्याला फक्त आपली जवळची माणसे सोबत असावी एवढच वाटत.. हा प्रसंग आयुष्यातला सगळ्यात मोठा अनुभव देऊ जातो.. या मध्ये जो तारला तोच वाचला.. मग तो आयुष्यातला कोणत पण संकट सहज पण पार पाडू शकतो..
काही लोक तारतात किव्वा स्वतः ला मारतात (सुसाईड हो) .. या मोह मायेच्या जाळ्या तुन जो सुटला तोच खरा.. बाकी सगळं आहेच .. "मर्द को दर्द.. and bla bla bla.."
हे उष्ट अन खरकटं आयुष्य झोकून द्यावं मृत्यूच्या अभेद्य कोठडी मध्ये, एका क्षणात.. हो.. अजिंक्य अश्या काळ्या कुट्ट कोठडी मध्ये कि जिथे आशेचा सूर्योदय कधीच नसावा... वडिलांविना जगण्या पेक्षा हे कधी पण बलवत्तर..
पण..
आई चा, माझ्या जिजाऊ चा चेहरा समोर उभा राहतो.. ताडकन.. अगदी पांढऱ्या शुभ्र निखळत वाहणाऱ्या धबदब्या प्रमाणे.. तो ओसंडून वाहणारा धबदबा सगळं काही घेऊन जातो.. होणारी अस्वस्थता.. अन मग हळूच मूत्रूच्या कोठडी कडे वळणारी पावले नकळत माघारी येतात.. रक्त बंबाळ होऊन.. अन तो परत एकदा शांत होतो.. खरंच आई हेच कारण आहे बस्तारा गुंडाळायला नाहीतर अवश्य प्रस्थान केल असत त्याने आपल्या वडीलां पाठोपाठ..
केहते है ना?
नज़रिया बदल के देख, हर तरफ नज़राने मिलेंगे..!
ऐ ज़िन्दगी यहाँ तेरी तकलीफों के भी दीवाने मिलेंगे..!
- मुकुंद पाडळे [25 Aug ratri 1.48]
💔💔💔💔💔
ReplyDelete